धक्कादायक! ‘छावा’ चित्रपट पाहताना प्रेक्षकाने केला राडा, सिनेमागृहातील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, नेमकं घडलं काय?

भरुच : सध्या छावा चित्रपट सर्वांच्या पसंतीस पडत असून या चित्रपटाचे कौतुक केलं जातं आहे. ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू असून, प्रेक्षकांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. यामुळे सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.

चित्रपटाच्या सगळ्या शोच्या तिकीटांवरही तुफान गर्दी आहे. एक घटना घडली ज्यामुळे चित्रपटाचे चांगले वातावरण गोंधळात पडले. चित्रपटात औरंगजेब शंभूराजांना कैद करतो आणि त्यांचा छळ करतो, अशा सीनमुळे एक प्रेक्षक चांगलाच भावनिक झाला. गुजरातमधील भरूच येथील सिनेमागृहात ‘छावा’ चित्रपट पाहताना ऐका प्रेक्षकाने रागात पडदा फाडल्याची घटना घडली.
रात्री सुरू असलेल्या शो दरम्यान चित्रपटाचा महत्त्वाचा क्लायमॅक्स सीन सुरू होता आणि त्याने पडदा फाडला. यामुळे थिएटरमधील पडद्याचे नुकसान झाले. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी त्या प्रेक्षकाला ताब्यात घेतले आहे. थिएटर मालकाने याबाबत माहिती दिली.

आरोपी प्रेक्षक शुद्धीत नव्हता. पडदा फाटल्यामुळे काही प्रेक्षकांना दुसऱ्या स्क्रीनवर चित्रपट दाखवण्यात आला, तर काहींना पैसे परत करण्यात आले. सध्या या चित्रपटात शेवटी छत्रपती संभाजीराजे यांची हत्या कशी करण्यात आली, याबाबत दाखवले आहे. यामुळे अनेकजण भावनिक झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, अभिनेता विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. रिलीजच्या पहिल्या दिवशीच सिनेमाने 31 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे ‘छावा’ 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमांच्या ओपनिंग डे कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले.
छावा’ सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहेत. त्याने या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, ज्याचे परिणाम सिनेमाच्या यशावर दिसून येत आहेत. या सिनेमात रश्मिका मंदाना, असे अनेक मोठे कलाकार आहेत. यामुळे चित्रपट सर्वांना आवडला आहे.