ब्राझीलमध्ये भारतीय वंशाच्या गायीला मिळाली ४० कोटींची किंमत, काय आहे वैशिष्ट्ये? जाणून घ्या..


नवी दिल्ली : भारतात गायींना धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. परंतु, एखादी गाय तब्बल ४० कोटी रुपयांना विकली गेली असे ऐकल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे ही गाय मूळ भारतीय गोवंशातील असून ती ब्राझीलमध्ये विकली गेली आहे.

याचा अर्थ भारतीय वंशाच्या गायींना परदेशात मोठी मागणी आहे आणि त्यांच्या गुणधर्मांना मोठे महत्त्व दिले जाते. मात्र, आपल्याच देशात या वंशाचे संवर्धन आणि त्याचा व्यावसायिक लाभ घेण्यावर तुलनेने कमी भर दिला जातो.

दरम्यान, ब्राझीलमध्ये विकली गेलेली गाय ही भारतीय नेल्लोर जातीची ‘व्हिएटिना-१९’ आहे. तिचे वजन जवळपास ११०१ किलो असून, ती इतर सामान्य गायींच्या तुलनेत दुप्पट वजनाची आहे. विशेष म्हणजे, ही गाय तब्बल ४.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४० कोटी रुपये या विक्रमी किंमतीला विकली गेली आहे. भारतीय गोवंशाच्या गायींच्या कार्यक्षमतेमुळे त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

भारतीय गोवंशाच्या वैशिष्ट्यांमुळे या जाती परदेशी देशांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकृत केल्या आहेत. ब्राझीलमध्ये गायींचे संवर्धन आणि प्रजनन सुधारणा करण्यासाठी मोठे संशोधन आणि प्रयोग केले जातात. “ओंगोल” जातीची गाय आधीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक महाग विकली गेलेली गाय म्हणून नोंदवली गेली होती. आता ‘व्हिएटिना-१९’ ही गायही त्याच श्रेणीत सामील झाली आहे. परंतु, भारताने स्वतःच्या गायींचे योग्य संवर्धन न केल्याने आपणच त्याचा व्यावसायिक फायदा मिळवू शकलो नाही.

त्यांच्या दुधाळता, टिकाऊपणा, रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रतिकूल हवामानात जगण्याच्या क्षमतेमुळे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत अनेक परदेशी देशांनी भारतीय गोवंश विकत घेऊन त्याचे संवर्धन केले आणि मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनासाठी त्याचा उपयोग केला.

गेल्या २५ वर्षांपासून भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश आहे. तरीसुद्धा, परदेशी संशोधक आणि दूध उत्पादक कंपन्यांनी भारतीय गोवंशाच्या जातींवर संशोधन करून त्यांच्यात अधिक सुधारणा केल्या. मात्र, भारतात अद्याप पुरेशा प्रमाणात संशोधन न झाल्यामुळे देशातील बहुतांश शेतकरी आणि उत्पादकांना या जातींची खरी गुणवत्ता आणि व्यावसायिक उपयोग समजलेला नाही.

भारतीय गायींच्या काही प्रमुख जातींमध्ये गीर, थारपारकर, सहिवाल, रेड सिंधी आणि कांकरेज या प्रामुख्याने उल्लेखनीय आहेत. याशिवाय, गीर गायीपासून तयार करण्यात आलेल्या “गिरोलांडो”, तसेच व्हिएटिना आणि ऑंगोल या जातींमध्ये अधिक दूध उत्पादन करण्याची क्षमता आहे. परदेशी देशांनी या जातींचे महत्त्व ओळखून त्यांचे संवर्धन केले आहे, त्यामुळे त्यांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!