वीज स्वस्त होणार!! दिवसाच्या वापराला मिळणार अधिक सवलत, महावितरण टीओडी मीटर मोफत बसवून देणार, जाणून घ्या…


पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षात ऊर्जा परिवर्तनासाठी भरीव काम करून सौर ऊर्जा वापराला महत्त्व दिले आहे. यामुळे अनेक अडचणी दूर होण्यास मदत होत आहे. महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीजदर याचिकेमध्ये दिलासा मिळणार आहे.

आता घरगुती ग्राहकांसाठीच्या वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागतानाच त्यांना दिवसा वीज वापरल्यास अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे, अशी माहिती महावितरणमधील अधिकाऱ्यांनी दिली. सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळाल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे.

त्यासोबतच सौर ऊर्जा दिवसा मिळणार असल्याने त्यावेळी जे घरगुती ग्राहक वीज वापरतील त्यांना प्रत्येक युनिटमागे ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्याचा प्रस्ताव मांडणेही महावितरणला शक्य झाले आहे, असे सांगण्यात आले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरासाठीच्या दरात सवलत देण्यात येईल.

दरम्यान, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रती युनिट ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ मध्ये ९० पैसे, २०२८-२९ मध्ये ९५ पैसे आणि २०२९-३० या वर्षात १ रुपया सवलत देण्यात येईल. आयोगाने मान्यता दिल्यानंतर १ एप्रिलपासून ही सवलत सुरू होऊ शकते, याबाबत महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावात तशी माहिती आहे.

दरम्यान, उन्हाळ्यात दिवसा पंखे, कूलर आणि एसी यांचा वापर वाढतो. त्यावेळीही ग्राहकांना टीओडी सवलतीचा अधिक उपयोग होईल. घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी महावितरणकडून त्यांना मोफत टीओडी मीटर बसवून देण्यात येणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!