राज्यातील सर्वात मोठी ब्रेकींग न्युज! शरद पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील भाजपच्या वाटेवर?

सांगली : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक जागा रिक्त असल्याचे सूचक विधान केल्यानंतर महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याच्या भाजपमध्ये प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली.

असे असताना जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगलीत राजाराम बापू शिक्षण संस्थेच्या विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे. यामुळे येणाऱ्या काळात राज्यात मोठा राजकीय निर्णय होऊ शकतो.
जयंत पाटील आणि भाजप प्रवेश यांच्या चर्चा नवीन नाहीत. 2019 मध्येही त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चेत रंगल्या होत्या. मात्र, त्याचवेळी अजित पवारांनी बंड करत सत्तेचा तडजोडीचा फॉर्म्युला शोधला आणि जयंत पाटील राष्ट्रवादीसोबत राहिले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. सध्या भाजपचे मजबूत सरकार असून विरोधकांचा सापडासूप झाला आहे.

यातच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जयंत पाटील यांचे सहकारी आणि मतदारसंघातील कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. यामुळे ते निर्णय घेऊ शकतात. सध्या मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सत्ता महत्त्वाची.
तसेच त्यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यास मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. जर जयंत पाटील भाजपमध्ये गेले, तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असलेल्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. जयंत पाटील यांचा शेतकरी वर्गावर चांगला प्रभाव आहे, त्यामुळे भाजपला अधिक बळ मिळेल.
दरम्यान गडकरींच्या उपस्थितीत होणाऱ्या भूमिपूजनामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची पहिली पायरी रचली जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, ते भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद स्विकारणार की राष्ट्रवादीत राहून संघर्ष करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत निर्णय होऊ शकतो.