अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय, आप’च्या सत्तेचा शेवट, दिग्गजांचा पराभव…

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (आप) सलग तिसऱ्यांदा विजयी होणार की भाजप राजधानीतील २७ वर्षांचा सत्तेचा दुष्काळ संपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर दिल्लीत भाजपने बाजी मारली.

यामध्ये दिल्लीत अनेक बड्या नेत्यांना पराभव बघायला मिळाला. यामध्ये कालकाजी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाशी झालेल्या चुरशीच्या लढतीत आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे. मात्र सरकार पडल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. आप आणि भाजपमध्ये जोरदार लढत झाली, त्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव करून निवडणूक जिंकली.
या जागेवर काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी दिली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कालकाजी मतदारसंघातून पुन्हा विजयी झालेल्या आम आदमी पक्षाच्या आतिशी यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यासह त्या दिल्लीच्या तिस-या महिला मुख्यमंत्री बनल्या. आपसाठी अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने मोठा धक्का बसला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आज लागलेल्या निकालात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपने मोठी मुसंडी मारली. दिल्ली मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. केजरीवाल ३१८२ मतांनी पराभूत झाले आहेत.
यामुळे दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी सध्या घडत आहेत. यामुळे केजरीवाल यांचा पराभव करणारे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी नाव आघाडीवर असणारे प्रवेश वर्मा कोण आहेत? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत.