भाजपने लोकसभेतील पराभवाचा बदला घेतलाच!! अयोध्येत अखेर कमळ फुलणार, विरोधकांना मोठा धक्का…


नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला अयोध्येतील पराभव जिव्हारी लागला होता. उत्तर प्रदेशासह आयोध्या लोकसभेची जागा भाजपला गमवावी लागली होती. मात्र आता भाजपने लोकसभा पराभवाचा बदला घेतला असून आयोध्या मतदारसंघातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपने विजय मिळविला आहे.

भाजपने प्रतिष्ठेच्या  या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. यामुळे भाजपचे लोकसभेच्या निकालाचा बदला घेतला असल्याचे सांगितले जात असून कार्यकर्ते आनंदी झाले आहेत. सकाळी साडे दहा वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार, पाच फेऱ्यांचे कल सध्या हाती आले आहेत.

यामध्ये भाजपचे उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी तब्बल 14 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना 27 हजार 115 मते पाचव्या फेरीअखेर मिळाली आहेत. यामुळे ते विजय मिळवतील, असे म्हटले जात आहे. याठिकाणी समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद पिछाडीवर पडले आहे. त्यांना 12 हजार 850 मते मिळाली आहेत. ते फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र आहेत.

मिल्कीपूर मतदारसंघ त्यांच्याच मतदारसंघातील आहे. त्यामुळे अजित प्रसाद यांची पिछाडी अवधेश प्रसाद यांच्यासह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासाठीही धक्कादायक मानली जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी मोठी चुरस निर्माण करण्यात आली होती.

याबाबत माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीआधी मिल्कीपूरचे लोकप्रतिनिधी अवधेश प्रसाद करत होते. त्यांनी लोकसभेसाठी राजीनामा दिल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यामुळे याठिकाणी मतदान पार पडले. बडे नेते याठिकाणी प्रचार करत होते.

याठिकाणी त्यांनी आपल्याच मुलाला उमेदवारी देत विजयासाठी मोठी तयारी केली होती. अखिलेश यादव यांनी जोरदार प्रचारही केला. विरोधात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचार केला. अनेक बड्या नेत्यांना त्यांनी कामाला लावले होते. यामुळे भाजपला यश मिळताना दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!