खुशखबर आली हो! १२ लाख रुपयांपर्यंत इनकम टॅक्स नाही, निर्मला सीतारमन यांची सर्वात मोठी घोषणा..


नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सध्या अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून आपल्या आठव्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी देशातील कोट्यवधी जनतेला मोठी भेट दिली आहे.

अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांच्या अपेक्षेनुसार, नवीन कर प्रणालीत काही बदल करण्यात आले आहेत, तर जुन्या कर प्रणालीत कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत.

तसेच १२ लाख रुपयांपर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही. भारत सरकारने २०२० मध्ये नवीन कर प्रणाली सादर केली, जी जुन्या रिजीमच्या तुलनेत अधिक साधी आणि सुलभ आहे. नव्या रिजीममध्ये फक्त NPS वर सूट दिला जाते. तर जुन्या रिजीममधून अनेक गोष्टींवर लाभ घेता येऊ शकतो.

दरम्यान, नवीन कर प्रणालीत कर स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे करदात्यांना अधिक लाभ होणार आहे. जुनी कर प्रणालीत कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत. म्हणून, ज्यांनी जुन्या कर प्रणालीचा अवलंब केला आहे, त्यांच्यासाठी विद्यमान नियम लागू राहतील. या बदलांमुळे करदात्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार योग्य कर प्रणाली निवडण्यास अधिक लवचिकता मिळेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!