मोठी बातमी! चेंगराचेंगरीनंतर महाकुंभात अग्नितांडव, १५ तंबू जळून खाक, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण..


प्रयागराज : उत्तरप्रदे़शात सुरु असलेल्या महाकुंभादरम्यान आगीची दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी याठिकाणी चेंगराचेंगरी होऊन 20 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी बांधलेल्या टेंट सिटीमध्ये भीषण आग लागली आहे.

झुंसी येथील छतनाग घाटातील नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आग लागल्याची माहिती आहे. या आगीत सुमारे १५ तंबू जळून राख झाले आहेत. अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन नियंत्रण मिळवले आहे. घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे बोलले जात आहे.

या घटनेने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. रस्ता चांगला नसल्याने घटनास्थळी पोहोचायला थोडा वेळ लागला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. येथील मंडप अनधिकृतपणे उभारले होते.

याआधी २० जानेवारीलाही महाकुंभा मेळ्यादरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये गीता प्रेसच्या छावणीसह मोठ्या प्रमाणात तंबू जळून खाक झाले होते. त्यानंतर काही जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यामुळे आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, १५ तंबूंना आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. महाकुंभ मेळ्याच्या बाहेरील बाजूस बांधलेल्या टेंट सिटीमध्ये भीषण आग लागली आहे. याबाबत आता प्रशासन खडबडून जागे झाले असून अनेकांनी व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!