मोदी सरकारचे शेतकऱ्यांना बजेटपूर्वी मोठं गिफ्ट, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, जाणून घ्या..


नवी दिल्ली : देशात १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करतय याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. अशातच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने चालणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे.

तसेच कृषी विभाग १ फेब्रुवारीपासून ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ नावाची मोहीम राबवून पीएमएफबीवाय अंतर्गत विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा पॉलिसी वितरित करणार आहे. चालू रब्बी हंगामात अनेक पिकांवर सुरक्षा कवच देण्यासाठी केंद्राने प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा घेण्यास सांगितले होते, त्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२५ होती.

आता पीक विम्यासाठी अर्ज बंद करण्यात आले आहेत. या पॉलिसी योजनेतील महत्वाची तरतूद म्हणजे शेतकरी आता पॉलिसीमध्ये काही तफावत किंवा तक्रार असल्यास, ते पंतप्रधान पीक विमा योजना पोर्टल https://pmfby.gov.in ला भेट देऊन किंवा 14447 वर कॉल करून माहिती मिळवू शकणार आहेत.

याशिवाय, शेतकरी PMFBY च्या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक 7065514447 वर संदेश पाठवून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळवू शकतात. तसेच तुम्ही तुमची विमा पॉलिसी येथून सहजपणे डाउनलोड करू शकता.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पीएमएफबीवाय ही जगातील सर्वात मोठी पीक विमा योजना आहे, तर प्रीमियमच्या बाबतीत ती तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी योजना आहे. ही योजना नैसर्गिक आपत्तींसह विविध टप्प्यांवर पीक संरक्षणाचे कव्हर प्रदान करते.

दरम्यान, यामध्ये, बियाणे पेरण्यापासून ते पीक काढणीनंतर काही काळापर्यंत कव्हर उपलब्ध आहे. त्याच वेळी, जर विमा कंपनीने वेळेवर भरपाई दिली नाही, तर कंपनीने शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याची तरतूद समाविष्ट केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!