महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय, नेमकं काय म्हणाले?

Mahakumbh Stampede : आज मौनी अमावस्या आणि शाही स्नानाचा दिवस. त्यासाठी उत्तर प्रदेश प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी झाली आहे. गंगा किनारी प्रयागराजमधील घाटांवर आज काही कोटी भाविक शाही स्नान करतील असा अंदाज आहे.

आज पहाटे महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना स्नानासाठी संगम नोजवर जाऊ नका असे आवाहन केलं आहे
घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, संगम नोजवर जाऊ नका आणि गंगा किनाऱ्यावर असलेल्या अन्य घाटांवर स्नान करा. त्यांनी भाविकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी अफवांपासून दूर राहण्याचेही सांगितले आहे.

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी घडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले.
याशिवाय, अखिल भारतीय अखाडा परिषदेतून मौनी अमावस्येचे अमृत स्नान सध्या रद्द केले असल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने मदत कार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.