भयंकर! लहान मुलासमोरच पत्नीची हत्या, घटनेचा व्हिडिओही रेकॉर्ड केला, पुण्यातील धक्कादायक प्रकार…


पुणे : शहरात प्रॉपर्टी वादाच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या करत संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या घटनेमुळे केवळ पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पहाटे ही घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, कौटुंबिक वादातून पतीने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्या पतीने या संपूर्ण घटनेचा रक्ताच्या थारोल्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडीओही तयार केला. यामुळे ही घटना समाजाच्या मानसिकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते.

हे सर्व कृत्य आपल्या लहान मुलासमोर केले. आणि त्यानंतर तो स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर झाला. पुण्यातील खराडी परिसरात पहाटे झालेल्या हत्याकांडाने खळबळ माजली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे. पतीने कात्री घेऊन पत्नीच्या गळ्यावर वार केला.

त्याने रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या पत्नीचा व्हिडीओ शूट करत हत्येचे कारणही सांगितले. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून त्याने त्याच्या बायकोलाच संपवले. हे सगळं केल्यानंतर तो आरोपी पती स्वत:च पोलीस स्टेशनला गेला आणि त्याने हत्येची कबुली दिली. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

याबाबत चंदननगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत, त्यामध्ये आणखी काय माहिती समोर येत हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. या घटनेने पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कुठे भर रस्त्यात गाड्यांची तोडफोड होते तर कुठे गोळीबार होतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!