ऑनलाइन जुगारात पाच एकर जमीन फुकली, तरीही पैसे कमी पडले म्हणून बहिणीच्या घरीच केली चोरी, पुण्यात धक्कादायक घटना…


पुणे : जमिनीचे पैसे ऑनलाइन जुगार घालवण्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. फुड डिलिव्हरी बॉयने ऑनलाइन जुगार पाच एकर शेतजमीन विकून सर्व पैसे हारल्यानंतर बहिणीच्या घरी चोरीही केली आहे.

यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तो पुण्यात येऊन घरपोच अन्न पुरविण्याचे काम करू लागला होता. परंतु पैसे कमी पडल्यामुळे तरुणाने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी आपल्या बहिणीच्या घरी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी श्रीकांत दशरत पांगरे ( रा. कुंभेजळगाव, गेवराई, बीड) असे आरोपीचे नाव आहे. पिंपरी भागातील वाल्हेकरवाडी येथील एका हौसिंग सोसायटीत १३ जानेवारी रोजी दुपारी घरफोडी झाल्याचे समोर आले होते.

यामुळे पोलीस तपास करत होते. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपास केला असता घरातील व्यक्तीनेच चोरी केल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता ऑनलाइन जुगार खेळून लोकांचे उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी बहीणीच्या घरामध्ये चोरी केल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, श्रीकांतला ऑनलाईन जुगार खेळण्याची सवय आहे असे पोलीस तपासात उघड झाले. अधिक तपास केला असता त्याने गावाकडील पाच एकर शेतजमीन विकून जुगारात पैसे हारल्याचे उघड झाल्यामुळे श्रीकांतवर पोलिसांचा अधिक संशय बळावला. यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!