पुण्यात 14 गायींना उडवणार्या बसचालकाचे निलंबन, गायींच्या मालकाला 50 हजार नुकसान भरपाई; पीएमपी प्रशासनाचा निर्णय…

पुणे : पुण्यात पीएमपी बसने 14 गायींना उडवणार्या बसचालकाला पीएमपी प्रशासनाने निलंबित केले आहे. यामुळे ही एक मोठी कारवाई केली गेली आहे. याबाबत चौकशी सुरू असून चौकशीअंती चालकावर आणखी कडक कारवाई होईल, असेही सांगण्यात आले आहे. याबाबत गायींच्या मालकाला नुकसानभरपाई देण्यात येईल, असेही सांगितले जात आहे.

याबाबत पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, कोंढणपूर भागातील आर्वी गाव परिसरात पीएमपी बसने शुक्रवारी 14 गायींना धडक दिली. यामुळे या गायी मालकाचे मोठं नुकसान झालं. यामध्ये काही गायींचा मृत्यू झाला. तसेच काही गायी गंभीर जखमी झाल्या.
यामुळे कारवाईची मागणी केली जात होती. या पीएमपी बसच्या चालकाला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. नंतर गायींच्या मालकाला पन्नास हजार रुपयांची मदत पीएमपीकडून देण्यात आली आहे. याबाबत चालकाचा जबाब घेण्यात आला असून, वरिष्ठ अधिकार्यांकडून या घटनेबाबत चालकाची चौकशी सुरू आहे.

पीएमपीच्या अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, गायींच्या मालकाचीही भेट घेतली. त्या वेळी अधिकार्यांनी गायींच्या मालकाला तातडीची मदत दिली. तसेच अजून आणखी मदत करण्याचे आश्वासन दिले. याबाबत शेतकरी आक्रमक झाले असून अजून मदतीची मागणी केली जात आहे.

आम्ही चालकाला तत्काळ निलंबित केले असून, त्याची चौकशी सुरू आहे. तसेच, गायींच्या मालकाला तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये मदत देण्यात आली आहे, असे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्यासह पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, अपघात विभागाचे अधिकारी, कात्रज डेपो मॅनेजर उपस्थित होते.