मैत्रिणीने घरी बोलावून केला घात, तरुणीवर सामूहिक बलात्कार, पुण्यातील घटनेने खळबळ..


पुणे : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या एका मैत्रिणीसह दोन जणांना अटक केली आहे. तर, अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे.

भारत रोहिदास गव्हाणे (वय. २८) आणि सुमोना भरत गव्हाणे उर्फ सुमोना नूर इस्लाम शेख (वय. २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही पुण्यातील सिंहगड रोड येथील वडगाव येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी मुंबईतील रहिवासी असून आरोपी सुमोना तिची मैत्रिण आहे. दरम्यान, शुक्रवारी सुमोनाने पीडिताला नवले पुलाजवळील आपल्या राहत्या घरी बोलावून घेतले.तिन्ही आरोपी तिच्या घरी आधीच होते.

पीडिता सुमोनाच्या घरी पोहोचल्यानंतर आरोपींनी तिच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार केले. पीडिताने विरोध केला असता आरोपींनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडिताने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!