कोणाचे तरी काढून मला मंत्रिपद….! छगन भुजबळ यांचे सर्वात मोठं वक्तव्य, आता अजित पवार काय बोलणार?


गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच जेष्ठ नेते भुजबळ नाराज असल्याने वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळालेले नाही. यामुळे ते नाराज आहेत.

त्यानंतर त्यांनी अजित पवारांवरती थेट टीका केली आणि तरी देखील अजित पवार यांनी त्यांच्या नाराजीबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेले नसल्याची चर्चा होती. त्यानंतर छगन भुजबळ परदेशात गेले होते, आता ते पुन्हा भारतात परतले आहेत. यामुळे ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे असताना छगन भुजबळ यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मला मंत्रिपद मिळावं म्हणून कुणाचं तरी काढा, असे माझ्या मनात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा नाराजीची कबुली दिली.

आज शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र एका मंचावरती दिसणार आहेत, त्यामुळे हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात एकाच मंचावर येणार आहेत. यावेळी ते राजकीय भाष्य करणार का? हे देखील लवकरच समजेल.

पुणे जिल्हृयातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी हे नेते चार वाजता एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा पहिला कार्यक्रम हा सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी आहे, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत, त्याच वेळी तिथे छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!