सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं धारदार शस्त्र कुठे? सुनावणीवेळी धक्कादायक माहिती आली समोर…


पुणे : पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी दिली होती. पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पुण्यातील मांजरी परिससरात ९ डिसेंबरला पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. सतीश वाघ यांच्यावर अपहरण केलं त्यानंतर चालत्या कारमध्ये चाकूने त्यांच्या गळ्यावर तब्बल ७२ वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. तर त्यांच्या अपहरणानंतर कारमध्येच त्यांच्यावर वार केले त्यांचा जीव गेल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून देण्यात आला होता.

तर ज्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले त्यानंतर ते भीमा नदीत फेकून दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना तपासादरम्यान दिली आहे. त्याचा तपास करण्यात आला मात्र, ते धारदार शस्त्र अद्याप सापडलेलं नसल्याची माहिती आहे.

न्यायालयात सरकारी पक्षाकडून सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी युक्तिवाद केला. यावेळी वाघमारे यांनी न्यायालयाला सांगितले, जाधव व गुरसाळे यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार पेरणे फाटा येथील भीमा नदीपात्रात टाकले असल्याचे सांगितले आहे.

त्यासमक्ष गोताखोर टीमच्या साहाय्याने नदीपात्रामध्ये शोध घेण्यात आला आहे. मात्र, हत्यार अद्याप सापडले नाही. तपास करायचा असल्याचा युक्तिवाद वाघमारे यांनी केला आहे. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत सर्व आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे.

दरम्यान, सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात पत्नी मोहिनी वाघसह सहा आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. मोहिनी वाघ व अतिश जाधव यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!