पुण्यात पबमध्ये सेलिब्रेशनच्या नावाखाली भलतंच सुरू? पबकडून कंडोम अन् ओआरएसचे वाटप केल्याने खळबळ, नेमकं कारण काय?


पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत. या वस्तू कोणत्या आहेत, हे समजल्यावर अनेकांना धक्का बसला आहे. याबाबत आता माहिती घेतली जात आहे.

याठिकाणी कंडोम अन् ओआरएसचे वाटप केले असल्याचे समोर आले आहे. याबाबत पबकडून सांगितले गेले आहे की, तरुणांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणी आता या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा पोलिसांनी नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. यामुळे हे वाटप नेमकं कशासाठी केलं, असा तपास सुरू आहे.

दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे.

यामुळे हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे, यामुळे याची चौकशी करण्यात यावी असेही म्हटले आहे. अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे, असे सुद्धा या पत्रात नमूद आहे.

दरम्यान, या वस्तू वाटल्याने याची पुणे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आता अधिकचा तपास केला जात असून यामध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!