मोठी बातमी! विमानाच्या भीषण अपघाताने जग हादरलं, 10 सेकंदात 179 प्रवाशांचा मृत्यू….

दक्षिण कोरियातील विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरुन विमानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.या घटनेत 179 जणांचा मृत्यू झाला आहे.

घटनेने जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 175 प्रवाशांपैकी 173 कोरियन नागरिक आहेत. 2 थाई नागरिक आहेत. पक्ष्याला आदळल्यानंतर विमान धावपट्टीवर उतरताना क्रॅश झाल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या मीडियाने केला आहे. याबाबत तपास सुरू आहे.
दक्षिण कोरियातील मुआन येथे हा अपघात झाला. सदर अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2 जण सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. लँडिंग गिअर फुटल्याने आग लागली. योनहॅपच्या रिपोर्टनुसार, लँडिंग गियर निकामी झाल्यानंतर पायलटने थेट विमान उतरवण्याचा निर्णय घेतला.

लँडिंगदरम्यान विमानाचा वेग कमी करता आला नाही आणि विमान धावपट्टीच्या शेवटच्या टोकाला पोहोचले. यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियातील मुआन येथे हा अपघात झाला. सदर अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विमान विमानतळाच्या शेवटी असलेल्या कुंपणाला आदळले आणि विमानाला आग लागली. जेजू एअरचे विमान, 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट्स घेऊन, थायलंडहून परतत असताना हा अपघात झाला. यामुळे हळहळ केले जात नाही. जगभरातून याबाबत श्रद्धांजली वाहिली जात आहे.