Crime News : इन्स्टाग्रामवरून प्रेम, नंतर प्रियकराची हत्या, प्रियसीला कळताच उडाला थरकाप, हादरवणारी माहिती आली समोर…


Crime News : राज्यात गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या राज्यात समोर येत आहे.

अशातूनच आत बीडमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रियकराची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हत्येची माहिती प्रेयसीला कळताच तिने देखील आयुष्याचा शेवट केला आहे.

त्यामुळे या घटनेने लव्हस्टोरीचा भयानक अंत झाला आहे.दरम्यान या प्रकरणात प्रियकराची हत्या नेमकी कुणी केली? आणि प्रेयसीने आयुष्याचा शेवट का केला? हे जाणून घेऊयात.

मिलालेल्या माहिती नुसार, रणजित गिरी नावाच्या एका मुलाची खांडवी येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर प्रेम जुळलं होतं.हे प्रेमप्रकरण पुढे जाऊन इतक्या टोकाला पोहोचले की दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र मुलीच्या कुटुंबियांनी २२ मार्च २०२३ रोजी मुलाविरोधात मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले होते.यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने त्या मुलावर बाल अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. Crime News

या सर्व घडामोडीनंतर आपल्या पोरीने प्रियकराचा नाद सोडावा यासाठी त्यानी तिचं लग्न लावून दिलं होतं. पण या लग्नानंतर दोघांमधलं प्रेम काय कमी झालं नाही,तर उलट कायम राहिलं. रंजीत हा त्याच्या विवाहित प्रेयसीला लग्न झाल्यानंतर देखील फोनवरून संपर्क करत होता.

दरम्यान, ही माहिती मुलीच्या नवऱ्याला कळताच त्याने ही बाब तिच्या आई वडिलांना सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनी पुन्हा आपल्या मुलीला संमजावण्याचा प्रयत्न केला.मात्र मुलगी समजण्यापलिकडे गेल्याने कुटुंबियांनी प्रियकराचा हत्येचाच कट रचला होता.

त्यानंतर मुलीच्या आईने सर्व नियोजन केले आणि जावई मुलीचे वडील आणि त्यांचे ओळखीचे एक जण या सर्वांनी मिळून प्रियकर रणजीत गिरी याचा खून केला. त्यानंतर रणजीतचा मृतदेह हा नांदगाव परिसरात कुकडीच्या कालव्यात पाण्यामध्ये फेकून दिला होता.

तसेच २३ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी हा मृतदेह पाहताच पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला असता प्रेमप्रकराणातून ही हत्या झाल्याचे निष्णण्ण झाले होते. कारण त्याच्या शरीरावर जखमा आढळल्या होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!