पुणेकरांनो काळजी घ्या!! शहरात पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, गारपीटही होणार, राज्यात चार जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट…


पुणे : सध्या हिवाळा सुरू असला तरी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पुण्यात थंडीचा जोर कमी झाला असून शहरासह जिल्ह्यात घाटमाथा आणि परिसरात पुढील तीन दिवस मेघगर्जना, वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस (Pune Rain Update) हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. पुण्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. यामुळे बाहेर पडताना छत्री सोबत घेऊन जावे लागणार आहे. शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात काही अंशांनी वाढ झाली आहे.

शहरात पावसाची शक्यता वर्तवली जात असली तरी देखील हवेत गारवा जाणवत आहे. यामुळे दोन्ही प्रकारचे वातावरण सध्या पुणेकर अनुभवत आहेत. शहरात सध्या धुके आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्यातील नाशिक, धुळे,जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पुढील चोवीस तासांत मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होईल, अशी शक्यता आहे.

यामुळे सध्या या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखीक विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

तसेच जळगाव, अहिल्यानगर येथे गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे दक्षिण भारतातून राज्यात बाष्पयुक्त वारे आले आहे. यामुळे असे बदल दिसून येत आहेत.

दरम्यान, उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने थंडीची लाट आहे. त्या शीतलहरी हवेच्या वरच्या थरांतून खालच्या थरांतही येते आहेत. यामुळे आज आणि उद्या राज्यातील बहुतांश भागांना हे अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत. यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!