मुंबई, पुणे, नागपूरनंतर आता ‘या’ शहरालाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेस!! जाणून घ्या कसा असणार रूट…

मुंबई : राज्याला आता आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी धुळ्याहून पुण्यासाठी आणि मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली. याला आता यश मिळताना दिसत आहे.

धुळे ते पुणे आणि धुळे ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार, असे खासदार यांनी म्हटले होते. याबाबत लवकरच निर्णय होईल पण, मराठवाड्यातील नांदेड शहराला देखील लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
याबाबत माहिती अशी की, मुंबई जालना वंदे भारत गाडीचा विस्तार नांदेड पर्यंत करण्यासाठी रेल्वे विभागाकडून हालचाली सुरू आहेत. यामुळे मुंबई ते नांदेड आणि नांदेड ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत अनेकजण नांदेडला जात असतात तसेच नांदेडहूनही मुंबईला जाणाऱ्यांची संख्या फारच जास्त आहे. यामुळे जालनापर्यंत धावणारी गाडी नांदेड पर्यंत धावली तर नांदेडच्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. असे झाले तर प्रवास सुखाचा होईल. याचा फायदा होईल.
असे असताना मात्र या विस्ताराचा काही प्रवासी संघटनांकडून विरोध केला जात आहे. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर असा प्रवास सुरु आहे.