महाराष्ट्रात ३७ व्या जिल्ह्याची निर्मिती? २६ जानेवारीला घोषणेची चर्चा, जिल्ह्याचं नावही ठरलं? नेमकं खरं काय?

मुंबई : महाराष्ट्रात आणखी एका जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. यामुळे हा जिल्हा नेमकं कुठे होणार आणि या जिल्ह्याचे नाव काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लातूरमधील उदगीर या जिल्ह्याची नव्याने निर्मिती होणार असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

नवीन वर्षाच्या २६ जानेवारी रोजी उदगीर जिल्हा निर्मितीची घोषणा होणार असल्याचं सांगितले जात आहे. याबाबत व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे ही अफवा आहे की वास्तव हे अनेकांना समजलं नाही. उदगीर जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार आणि मुखेड तालुक्यातील काही गावांचा समावेश होणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहे.
यामुळे मुखेड, लोहा आणि कंधार तालुक्यातील जनतेची धाकधूक वाढली होती. या मेसेजमुळे चर्चांनाही उधाण आले होते. असे असताना हा मेसेज खोटा असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जर असा जिल्हा होत असेल तर प्रशासकीय स्तरावर कुठल्याही हालचाली सुरु नाहीत. एखादा नवीन जिल्हा निर्मिती करायचा असेल तर त्यासाठी हरकती, सूचना मागवल्या जातात. मात्र हालचाल सुरू नसल्याने याबाबत अजून कोणत्याही प्रकारची खरी माहिती समोर आली नाही. यामुळे ही अफवा असल्याचे दिसून येत आहे.
असा निर्णय घेयचा असेल तर मंत्रिमंडळात त्यावर निर्णय होतो. जिल्हा निर्मितीसाठी मोठी प्रक्रिया असते. पण अशी कुठलीही प्रक्रिया सध्या सुरु नाही. यामुळे हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर मात्र उदगीर जिल्हा निर्मिती होणार असल्याचा मेसेज देखील तुफान व्हायरल होत आहे.