Devendra Fadnavis : वाल्मिक कराडला सोडणार नाही, मोक्का लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा…

Devendra Fadnavis : एकीकडे नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेवर उत्तर दिले आहे. बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली. वाल्मिक कराडचा एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.दुसऱ्या प्रकरणात संबंध आढळल्यास कारवाई करु, अशी घोषणा केली आहे.
बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली इथंपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील. बीड जिल्ह्यातील लॉसनेस स्थिती पाहायला मिळतेय ती संपवावी लागेल. अवाडा एनर्जी यांनी फार मोठी गुंतवणूक पवनऊर्जा क्षेत्रात केलेली आहे. Devendra Fadnavis

यातून मोठ्या प्रमाणावर कामं निघत आहेत, काही लोकांना रोजगार मिळतोय. काही काम आम्हालाच द्या नाही तर खंडणी द्या, अशा मानसिकतेत काही लोक वावरत असल्याचं पाहायला मिळतं. याच गुन्ह्यामध्ये ६ डिसेंबरला अवाडा एनर्जीचं ऑफिस आहे तिथं अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे आरोपी तिथे गेले होते. त्यांनी वॉचमनला शिवीगाळ व मारहाण केली.
सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरला त्यांनी मारहाण केली. मारहाण झाल्यामुळे पीडितांनी सरपंचांना कॉल केला. बाजुच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच आले. दादागिरी करत असल्याने सरपंचांच्या लोकांनी चोप दिला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ९ डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते.
पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले, त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले, स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली.तारांनी गुंडाळून मारहाण केली. गाडीतून उतरवत मारहाण केली. ते मृत झाल्यावर हे सर्व लोक पळाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.