Chhagan Bhujbal : ब्रेकिंग! राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ नाराज, उपमुख्यमंत्रीपदाची कार्यकर्त्यांकडून मागणी, बड्या ओबीसी नेत्याचे मोठे वक्तव्य.

Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला असून या विस्तारात एकूण ३९ आमदारांना मंत्री म्हणून स्थान देण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळाची संख्या ४२ वर गेली आहे. भाजपच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महत्वाचे विधान केले आहे. भुजबळ उपमुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. Chhagan Bhujbal
लक्ष्मण हाके काय म्हणाले?
ओबीसी नेते असलेले लक्ष्मण हाके म्हणाले, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना मंत्रीपद हवे होते. ओबीसींची ठाम भूमिका घेणारी माणसे मंत्रिमंडळात हवी होती. या संदर्भात मी भुजबळ साहेबांशी बोलणार आहे. आता भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळाले नाही.

परंतु कदाचित त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात येईल, असा सकारात्मक विचार आम्ही करत आहोत. ओबीसींचे आंदोलन सक्षमपणे महाराष्ट्रात आम्ही उभे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.