Maharshtra Politics : फडणवीस पुन्हा एकदा देणार शरद पवारांना धक्का!! पवारांच्या खासदाराची भेटही झाली, राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस?

Maharshtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्यात येणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या मोहीमेतंर्गत शरद पवार गटाचे काही खासदार फोडले जाऊ शकतात, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे एकूण ८ खासदार निवडून आले होते.

यापैकी पाच ते सहा खासदारांना गळाला लावून मविआला झटका देण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचे सांगितले जाते. शरद पवार गटातील या खासदारांना राजीनामा द्यायला लावून महाराष्ट्रातील पाच ते सहा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते. या आमदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आणून भाजपप्रणित एनडीए आघाडीची ताकद वाढण्याचा भाजपचा प्लॅन असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे राज्यात भाजपचे ऑपरेशन लोटस नेमके कधी सुरु झाले, याविषयी चर्चेचा सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सागर बंगल्यावर झालेली देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांची भेट हा ऑपरेशन लोटसचा आरंभबिंदू होता का, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. Maharshtra Politics

भाजपने खरोखरच ऑपरेशन लोटस राबवायचे ठरवल्यास लोकसभेला निवडून आलेले शरद पवार गटाचे किती खासदार भाजपसोबत जातील, याविषयी राजकीय वर्तुळात अंदाज लावले जात आहेत.
मविआचे काही खासदार आमच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दुजोरा दिला. शरद पवार साहेबांचे खासदार जिथं आहेत तिथं महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्याचबरोबर विकास हाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर आपलं राजकीय भविष्य नीट व्हावं असं त्यांना वाटत असेल, असे सूचक वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले.