Pune Accident News : वेगाने येणाऱ्या कारची महिला कॉन्स्टेबलला धडक, नाकाबंदीवेळी अपघाताचा थरार, अपघातानंतर आरोपी पळाला….

Accident News : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात काल रात्री एका महिला कॉन्स्टेबलला नाकाबंदी दरम्यान उडवल्याची घटना घडली आहे. यात भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी कारने नाकाबंदीसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली आहे.

पुणे स्टेशन परिसरात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघतानंतर अज्ञात चार चाकी वाहनचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयित आरोपीचा ही शोध घेत आहे. मात्र हा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, या अपघातात रात्री गस्तीसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलिस जखमी झाली आहे. दीपमाला नायर असं जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पोलिस सीसीटिव्हीच्या माध्यमातून आरोपीचा तपास करत आहेत.

याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस वाहन चालकाचा तपास करत असल्याची माहिती झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.