Politics News : महिलांच्या खात्यात एक तारखेला खटाखट तीन हजार रुपये येणार, बड्या नेत्याने केली मोठी घोषणा..

Politics News : महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यासाठी २० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रचार रंगात आला आहे. या दोन्ही गटाच्या नेत्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे.

अशातच आता नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये महिलांसाठी ‘महालक्ष्मी योजना’ची घोषणा केली असून, यानुसार महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत.
राहुल गांधींनी सांगितले की, महिलांना हे ३००० रुपये सकाळी उठल्यावर त्यांच्या खात्यात दिसतील. तसेच, महिलांना सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी मोफत तिकीट उपलब्ध करणार असल्याची माहिती दिली.

राहुल गांधी यांनी या सभेत भारत सरकारमधील आदिवासींच्या कमी प्रतिनिधित्वावरही आवाज उठवला. त्याने म्हटले की, भारत सरकारमध्ये ९० अधिकारी काम करत आहेत, परंतु त्यामध्ये फक्त एक आदिवासी अधिकारी आहे. तेही निर्णय प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही. Politics News
आदिवासी समाजाला राज्य आणि केंद्र सरकारमध्ये न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार, आदिवासी अधिकारीांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार आहे.
दरम्यान, याशिवाय, राहुल गांधींनी शेतकऱ्यांना तीन लाख रुपये कर्जमाफी देण्याचा वादा केला आणि आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेची रद्द करण्याची घोषणा केली. बेरोजगारांना ४००० रुपये महिन्याला देण्यात येतील, तसेच अडीच लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.
आरोग्य सेवेसाठी राज्यात २५ लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा देण्याचाही त्यांनी वादा केला. यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे, आणि राज्यातील निवडणुकीच्या वाऱ्यात हा मुद्दा चर्चेत आला आहे.