Rail Accident : मोठी बातमी! कोलकाता सिकंदराबाद- शालीमार एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले…


Rail Accident : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील नालपूर येथे आज सकाळी रेल्वे अपघात झाला. सिकंदराबादहून शालिमारकडे येणाऱ्या एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत.

माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि बचाव पथक दाखल झाले. पहाटे साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात सिकंदराबादहून शालिमारकडे (क्र.22850) येणाऱ्या एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले आहेत.

या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पहाटे साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. हावडा-खड़गपूर रेल्वे मार्गावर हा अपघात झाला. अपघातात रुळावरून घसरलेल्या चार डब्यांपैकी एक पार्सल व्हॅनचाही होता. Rail Accident

अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार ट्रेनचा वेग नेहमीपेक्षा कमी होता. अचानक जोरदार धक्का जाणवला. सीटच्या वर ठेवलेल्या वस्तू खाली पडल्या. चालकाने लगेच ट्रेन थांबवली. काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले तेव्हा त्यांना चार डबे रुळावरून घसरल्याचे दिसले.

दरम्यान, या अपघातानंतर हावडा-खड़गपूर रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जोपर्यंत रेल्वेच्या बोगी रुळावर आणल्या जात नाहीत, तोपर्यंत या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. लवकरच या मार्गावरूनही गाड्या सुरू होतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!