Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे कधी येणार? एकनाथ शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य…


Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे जमा झाले आहेत. तसेच आता चर्चा सुरू आहे ती डिसेंबर महिन्याच्या पैशांची. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी दिली आहे.

या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार, यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्र्यांनी गुडन्यूज दिली आहे. एवढेच नाही, तर लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचे आपले स्वप्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. Ladki Bahin Yojana 2024

लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यांच्या पैशांसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचे पैसे कोड ऑफ कंडक्टमध्ये अडकू नयेत, म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसेही ऑक्टोबर महिन्यातच देऊन टाकले.

मी अता आपल्याला सांगतो की, २० नोव्हेंबरला निवडणूक आहे. २३ नोव्हेंबरला निकाल आहे. यानंतर, याच नोव्हेंबरमध्ये आम्ही डिसेंबरचे पैसे देणार. कारण आमचा हेतू स्पष्ट आहेत. आम्ही देणारे लोक आहोत घेणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!