Ajit Pawar : बारामतीतून लढणार नव्हतो पण…! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठं वक्तव्य, बारामतीत नेमकं काय घडलं


Ajit Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत झाली होती. आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्येही पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. बारामती मतदारसंघातून उभंच राहत नाही, असं मी सुरूवातीला म्हणत होतो, असे मोठे वक्तव्य अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर केले आहे.

पुढे अजित पवार असेही म्हणाले, पुरंदर, शिरूर, हवेली, सिन्नरमधील कार्यकर्ते बोलवत होते. एवढी कामं केलीत की कार्यकर्ते म्हणत होते की तुम्हाला बिनविरोध निवडून आणू, पण म्हणतात ना जिथे पिकते तिथे विकत नसते, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.

बारामतीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे सुरू असताना नागरिकांशी संवाद साधताना अजित पवार यांनी असं वक्तव्य केलंय. ‘माझी प्रशासनावर जी पकड आहे ती इतर कुणाची नाही आणि भावनिक होऊन जर काही करायला गेलात. तर तो तुमचाच अधिकार आहे. Ajit Pawar

मी सुरूवातीला म्हणत होतो बारामतीत उभंच राहत नाही. त्यावेळी मला पुरंदर, शिरूर, हवेली, सिन्नर या भागातील कार्यकर्ते मला बोलवत होते. दादा तुम्ही ऐवढी कामे केली की तुम्हाला मी बिनविरोध निवडून आणतो. पण असं म्हणतात ना जिथं पिकतं तिथं विकत नसतं त्यातला तो प्रकार आहे. असे अजित पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!