Gold Price : दिवाळीची सुरुवात होताच सोन्याच्या दरात बदल, पुण्यात काय आहेत सोने-चांदीचे दर?

Gold Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे . गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

तसेच आजपासून या दिवाळीच्या सणाला सुरुवात होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी विक्री ही मोठ्या प्रमाणात केली जाते. सणामुळे सोन्याला झळाली आलेली पाहिला मिळते. याचनिमित्ताने सध्या सोने चांदीचे दर काय आहेत, हे जाणून घेऊयात.
काल १ ग्रॅमसाठी सोन्याचे दर हे ८२९ होते. तर आज ७९८० इतके दर आहेत. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७९८००आहे. तर काल हीच किंमत ८०२९० होती. तसेच १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ही ७३१५० इतकी आहे.

चांदीचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे दिसत आहे. १ ग्रॅम चांदीचे दर हे ९८ रुपयांपासून १ किलो चांदीचे दर ९८००० हजार रुपयांच्या वर गेले आहेत. Gold Price
दरम्यान, चांदीचे दर हे स्थिर असून तर सोने ४९० रुपयांनी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दरामध्ये चढ उतार होत असून दर पुढील काही काळात असेच पाहायला मिळणार आहे.