हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठी जबाबदारी !पार्लमेंटरी बोर्डात सदस्य म्हणून नियुक्ती …


इंदापूर : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश करताना पंधरा दिवस उलटताय तोच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील यांना पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या विधानसभेला भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभेसाठी उमेदवारी मिळत नसल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या पार्लमेंटरी बोर्डात सामावेश करण्यात आला आहे. या पक्षाची मुंबईत शनिवारी (दि.१९) झाली. यावेळी हर्षवर्धन पाटील थेट शरद पवारांच्या शेजारी बसलेले पाहायला मिळाले आहे.

भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्षपद तसेच
संघटनेत मोठी जबाबदारी दिली होती. त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांना युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचा योग्य प्रकारे सन्मान राखल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी पार्लमेंटरी बोर्डात हर्षवर्धन पाटील यांना स्थान मिळाले असले तरी लोकसभेत पक्षाशी निष्ठेने काम करणारे निष्ठावंत पदाधिकारी त्यांच्या प्रवेशाने नाराज झाले आहेत. त्यांनी विधानसभेत तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढविण्याचा इरादा स्पष्ट केल्याने हर्षवर्धन पाटील यांची विधानसभेची बिकट होण्याची परिस्थिती उद्भवणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!