Maharashtra Election 2024 : ठाकरे गटाकडून शिलेदारांची नावे जाहीर? संभाव्य उमेदवारांची यादी समोर, जाणून घ्या…


Maharashtra Election 2024 : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घोषित केली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊन दोन दिवस उलटले आहेत.

मात्र अद्याप राज्यातील कोणत्याही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाची संभाव्य यादी समोर आली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात जागा वाटपाबाबत २५० जागांवर सहमती झाली असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांना किती जागा सोडण्यात येणार, याबाबतही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ असणार आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सर्वाधिक जागा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस विदर्भात सर्वाधिक जागांवर लढवणार असून काही जागांबाबत शिवसेना ठाकरे गटासोबत वाद असल्याची चर्चा आहे. Maharashtra Election 2024

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यातील काही उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचाराला लागण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबईतील संभाव्य आमदार..

आदित्य ठाकरे – वरळी
सुनील राऊत – विक्रोळी
सुनील प्रभू – दिंडोशी
अजय चौधरी – शिवडी
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
संजय पोतनीस – कलिना
प्रकाश फातर्पेकर – चेंबुर
रमेश कोरगांवकर – भांडुप पश्चिम

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!