Pune Crime : तरुणीचा आईसमोर नातेवाईकाने केले धक्कादायक कृत्य, आरोपीविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
तरुणी आई व बहिणीसमवेत बसली असताना तेथे येऊन एका नातेवाईकाने तिच्याशी अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केला. त्याला तिने विरोध केल्यावर आता सोडले पुढच्या वेळी रेपच करेन, अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

विकी विद्याधन नायर (वय ३५, रा. केशवनगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना फिर्यादीच्या घराबाहेर रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली आहे. Pune Crime


सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी, तिची आई व बहिण हे बसले होते. त्यावेळी विकी तेथे आला. फिर्यादीबरोबर अश्लिल चाळे करु लागला. तिच्या अंगाशी झटू लागला. तेव्हा तिने विकीला प्रतिकार केला. त्यावर तो आता तुला सोडले, परत सापडली तर तुझ्यावर रेप करीन अशी धमकी देऊन विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक लिंगे तपास करीत आहेत.