Sharad Pawar : शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला, म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी….

Sharad Pawar : सत्तेत असलेल्यांनी जे करायला हवे ते केले नाही, त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. महाराष्ट्रामध्ये बहिणींसाठी आणि त्यांच्या सन्माननासाठी लाडकी बहीण योजना आणली जाते.
पण स्त्रियांना ५० टक्के आरक्षण आम्ही दिल्याचे शरद पवार म्हणाले. त्यामुळे स्त्री सरपंचपदापासून अनेक पदावर गेल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली? असा सवाल करत पवारांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.

स्त्रीचा सन्मान करायचा असेल तर तो टिकाऊ असला पाहिजे असंही पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेमधून पैसे देतात, त्यावर मी बोलणार नाही. पण आज कुठे ना कुठं स्त्रीयांवर अत्याचार होतात असे पवार म्हणाले आहे. Sharad Pawar


आज इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा पार पाडली, यावेळी पवार बोलत होते. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा ही ऐतिहासिक असल्याचे पवार म्हणाले. सत्ता असलेल्यांना महाराष्ट्र हिताची जपणूक करता येत नाही, त्यामुळं महाराष्ट्र मागे जातोय असंही ते म्हणाले.