Crime News : राज्यात चाललंय तरी काय? अल्पवयीन मुलावर ९ जणांनी केला सामूहिक बलात्कार, घटनेने अहमदनगर जिल्हा हादरला…
Crime News : एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. येथील ९ जणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. Crime News
या अत्याचार प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. Crime News
दरम्यान, ११ वर्षीय वर्षीय अल्पवयीन मुलास धमकावून हा अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला असून पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची गांभीर्यता समोर आली आहे.