Pune : बोपदेव बलात्कार प्रकरणी आरोपी घटनेच्या ठिकाणी, आरोपींनी दाखवली ‘ती’ जागा, कपडेही जप्त…


Pune : पुण्यातील बोपदेव घाटात काही दिवसांपुर्वी फिरण्यासाठी गेलेल्या तरूण, तरूणीला मारहाण करून त्यांच्याजवळ असलेल्या मौल्यवान वस्तू लुटून तरूणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती.

अशातच आता प्रकरणाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. बोपदेव घाटात ही घटना घडली ते ठिकाण आरोपीने पोलिसांना दाखवले. सोबतच तरूणीवर अत्याचार केलेले घटनास्थळ देखील आरोपीने दाखवले आहे.

या प्रकरणी धाक दाखवण्यासाठी आरोपीकडून वापरले गेलेले दांडके आणि कपडे जप्त करण्यात आले आहेत. अटकेत असलेल्या आरोपीने मुलगी आणि त्याच्या मित्राला धमकावण्यासाठी वापरलेले दांडके व त्याचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. चंद्रकुमार कनोजिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अख्तर शेख याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, त्याला अद्याप न्यायालयात हजर केलेले नाही. पुणे पोलिसांकडून आणखी एका आरोपीचा शोध अद्यापही सुरूच आहे. 3 ऑक्टोबरला बोपदेव घाटातील टेबल पॉइंट परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. Pune

या प्रकरणी एकामागून एक खुलासे समोर येत आहेत, तर हा गुन्हा करण्यापुर्वी आरोपींना दारू प्यायली होती. गांजाचे सेवन केले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. बोपदेव घाटात गुन्हा करण्यापुर्वी आरोपींनी दारू आणि गांजाचे सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांनी हा गुन्ह्या केल्यानंतरही आपले मोबाईल फोन देखील बंद करून ठेवले होते.

तसेच आरोपींनी त्यांचे मोबाईलफोन फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. सामूहिक अत्याचार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या तिसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!