Silver : ऐन सणासुदीच्या काळात चांदीच्या दरात मोठी दरवाढ, केला १ लाख रुपयांचा टप्पा पार…

Silver : भारतात सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या खरेदी मोठ्या प्रमाणात होते. सोन्या-चांदीच्या मागणी वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरात सुद्धा मोठी वाढ होते. सराफा बाजारात चांदीचा भाव एक लाख रुपयांहून अधिक होताना दिसत आहे.

आज फ्युचर्स मार्केट म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर साप्ताहिक सुट्टी आहे, त्यामुळं आज भाव फ्युचर्स मार्केटमध्ये नाही तर देशांतर्गत बाजारात दिसतील. चांदीचे दर एक लाख रुपयांच्या वर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत चांदी एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे.
आज, चांदीच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर, दिल्लीतील चांदीचे दर प्रति किलो १,०१,००० रुपयांच्या वर आहेत. हैदराबादमध्ये चांदीचा दर १,०३,००० रुपये प्रति किलो आहे. Silver

केरळमध्येही चांदी १,०३,००० रुपये प्रति किलोच्या वर पोहोचली आहे. तर देशातील अनेक राज्यांमध्ये चांदी ९७,००० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. यापूर्वी ११ ऑक्टोबर रोजी चांदीच्या दरात किलोमागे २००० रुपयांची वाढ झाली होती.
चांदीचा भाव १ लाखांच्या पुढे जाण्याचे कारण?
देशात सोने खूप महाग झाले आहे. आता गुंतवणूकदार सोन्याबरोबरच चांदीला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. त्यामुळे सोन्यापेक्षा जास्त चांदी खरेदी करण्यात गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे.
यानंतर सोन्याच्या तुलनेत चांदीच्या वाढीची टक्केवारी अधिक झाली असून आज पुन्हा एकदा चांदी एक लाख रुपयांच्या वर पोहोचली आहे. चांदीचा वापर उद्योगांमध्येही केला जातो आणि सध्या चांदीमध्ये उच्च पातळी दिसून येत आहे. कारण देशात औद्योगिक उपक्रम वेगाने सुरू आहेत.