Pune Crime : बोपदेव घाटातल्या नराधमांची कुंडली अखेर समोर! अख्तर, सोम्या अन् चंद्रशेखर, पोलिसांनी कसे शोधले आरोपी?

Pune Crime : काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. दरम्यान हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

अख्तर, सोम्या आणि चंद्रशेखर अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत.
तिघांपैकी दोघांवर याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळतेय. हे आरोपी गुन्हा करण्यापूर्वी एका वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी एकत्र आल्याचे एक सीसाटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासात समोर आले होते. या फुटेजमध्ये पीडितेच्या मित्रानं आरोपींना ओळखलं आणि त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

बोपदेव प्रकरणातले तीनही आरोपी हे मध्य प्रदेशचे असून मागच्या काही वर्षांपासून पुण्यात कचरा वेचण्याचं काम करतात. बोपदेव घाटातल्या घटनेच्या रात्री तिन्ही आरोपींनी येवलेवाडीतल्या बिअर शॉपमधून बिअर विकत घेतली होती. Pune Crime

बिअर प्यायल्यानंतर तिन्ही आरोपी बोपदेव घाटात गेले आणि पीडित मुलीवर अत्याचार केले. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर ते बोपदेव घाटातून खाली उतरले. घाट उतरल्यानंतर तिन्ही आरोपी खेड शिवापूरला गेले. पोलिसांना चकवा देण्यासाठी तिघांनी वेगळा मार्ग घेतला आणि ते रात्रभर फिरत राहिले.
या दरम्यानच्या काळात त्यांनी मोबाईलचाही वापर केला नाही. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर केला, तसेच ७०० ठिकाणचे सीसीटीव्हीही पोलिसांनी तपासले.