Sayaji Shinde : मोठी बातमी! अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश…

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत सयाची शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते.
सयाजी शिंदे यांचे सामाजिक क्षेत्रात चांगल काम आहे. त्यामुळे आम्ही आज आमच्या सोबत त्यांना घेत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रवेशावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे.
सयाजी शिंदे यांनी अनेक चित्रपट, नाटकात काम केलं आहे. तसेच त्यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपटांमध्येही मोठं काम केलं आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे देखील प्रसिद्ध आहेत. सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी स्वत:हून पुढे येत लाखो झाडे लावली आणि त्यांना मोठे केले आहे.
त्यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईचं सर्वत्र कौतुक झालं. सयाशी शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशामुळे पक्षालादेखील फायदा होण्याची शक्यता आहे. सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरुवातीला त्यांचं स्वागत केले आहे.
सयाजी शिंदे यांचा अजितदादा गटात प्रवेश. सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाची सुरुवात केवळ राष्ट्रवादीवरच्या फोकसने सुरू झाली. सयाजी शिंदे खडतर परिस्थितून पुढे आले आहेत. त्यांनी सिनेक्षेत्रात अद्वितीय स्थान निर्माण केलं आहे. मराठी मनाला अभिमान वाटावं असं आहे. त्यांनी आपल्याला सीमित ठेवलं नाही. त्यांनी पर्यावरणावर चांगलं काम केलं आहे, असं सुनील तटकरे म्हणाले.