Nashik : मोठी बातमी! नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये फायरिंगचा सराव करताना मोठा स्फोट, दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू…

Nashik : नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये स्फोट झाल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. सरावावेळी फायरिंग करत असताना स्फोट झाल्याने अग्निवीरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जाते. काल दुपारी आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांचा सराव सुरु होता. याच प्रशिक्षणादरम्यान फायरिंग करत असताना अचानक स्फोट झाला. यामुळे आर्टिलरी सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली होती.
सराव सुरु असताना स्फोट झाल्याने यात दोन अग्निवीर गंभीर जखमी झाले. गोहिल सिंग आणि सैफतत शीत असे या अग्निवीरांचे नाव आहे. मात्र आता या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

भारत सरकारने सैन्यदलात सेवा बजावण्यासाठी इच्छुक असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निविरांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती. Nashik

दरम्यान, याअंतर्गत नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रात देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मागील वर्षी दाखल झाले होते. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशभरात २५ हजार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती करण्यात आले.