Sanjay Raut : लाडकी बहीण योजनेबद्दलची पोस्ट करणं संजय राऊतांच्या अडचणी वाढवणार, पोलिसांकडून गुन्हा दाखल..


Sanjay Raut : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर अनेकदा टीका करताना दिसतात, मात्र या योजनेबाबत केलेल्या एका पोस्टमुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चित्र दिसत आहेत. Sanjay Raut

लाडकी बहीण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवल्याबाबतची तक्रार संजय राऊतांविरोधात करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडल्याचा खोटा दावा राऊतांनी केला होता. याप्रकरणी भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या तक्रारीनंतर संजय राऊत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सजंय राऊत यांनी ‘लाडकी बहीण’ योजना बंद पडल्याची खोटी अफवा पसरवली होती, ज्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी म्हणजे ७ आक्टोबरला सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडली आहे, महाराष्ट्रातील योजना बंद पडेल असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर मध्य प्रदेशमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाडकी बहीण योजना सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!