Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचे दहा उमेदवार जाहीर, सर्व मुस्लिम नेत्यांना दिली उमेदवारी, फटका कोणाला बसणार?


Vanchit Bahujan Aghadi : आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. तर, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. वंचित जाहीर केलेल्या यादीमुळे मविआच्या गोटात चिंता वाढण्याची शक्यता आहे.

वंचितने पहिल्या यादीत आम्ही नांदेड दक्षिणमधून मुस्लिम उमेदवार दिला आहे. आज परत दुसऱ्या यादीत आम्ही १० मुस्लिम उमेदवारांची यादी जाहीर करतोय. सोबतच राज्याच्या राजकारणात आम्हाला मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायचे असल्याची माहिती रेखा ठाकूर यांनी दिली आहे. Vanchit Bahujan Aghadi

वंचित बहुजन आघाडीने आपल्या दुसऱ्या यादीत १० उमेदवारांची यादी जाहीर केली. यादीतील सगळे उमेदवार मुस्लिम आहेत. पहिल्या यादीत आम्ही नांदेड दक्षिणमधून मुस्लिम उमेदवार दिला असल्याचे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले. या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मुस्लिमांनादेखील आम्ही प्रतिनिधीत्व देत असल्याचे रेखा ठाकूर यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीने परभणीत सय्यद साहेबजान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सय्यद साहेबजान हे काँग्रेसचे माजी उपमहापौर असून विद्यमान महापालिका सभागृह नेते आहेत. सय्यद हे परभणीतील काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी आहे. सय्यद साहेबजान यांना उमेदवारी जाहीर होणे हा मविआला धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!