Airtel Network : एअरटेलची सेवा पूर्व हवेलीत अधिककाळ विस्कळीत, मोबाईल धारकांना त्रास…


Airtel Network : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोरसह परिसरात एअरटेल कंपनीच्या मोबाईलचे नेटवर्क तब्बल सहा तास नसल्याने वापरकर्त्यांना बऱ्याच काळापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सोमवारी (ता.७) सकाळी दहा वाजल्यापासून नेटवर्क नसल्याने ग्राहक चांगलेच त्रस्त होऊन मेटाकुटीला आले.

सविस्तर माहिती अशी की, लोणी काळभोरसह व कदमवाकवस्ती परिसरात सोमवारी (ता.०७) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एअरटेल कंपनीच्या मोबाईलचे नेटवर्क गेले होते. यामुळे नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करताना अडचणी येत होत्या.

कारण प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल फोनवर फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे, भारत पे, पेटीयम यासारख्या डिजिटल व्यवहार करण्यासाठी नेटवर्क नसल्याने ग्राहकांचे व्यवहार खोळंबल्याचे दिसत आहेत. तर मोबाईल नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप होणे, आवाज ऐकायला न येणे, फोन दुसरीकडेच वळवणे अशा नागरिकांना अडचणी येत होत्या. Airtel Network

दरम्यान, सध्या पूर्व हवेलीतील सर्वच भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता टॉवरची संख्या कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

कॉल ड्रॉप आणि रेंज प्रॉब्लेम या समस्यामुळे एअरटेल कंपनीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. तर सोमवारी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेले तरी एअरटेल कंपनीकडून सेवा पूर्ववत झाली नाही. त्यामुळे एअरटेल वापरकर्त्यांना बऱ्याच काळापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!