नामर्दपणा ! पन्नास वर्षीय महिलेला लाथा बुक्कांनी मारहाण ; शिरुर तालुक्यातील घटनेमुळे सर्वत्र संताप …

शिरुर : शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील एका पन्नास वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरुन तिच्या तोंडावर, गालावर हाताने मारहान केली. या मारहाणी दरम्यान महिला खाली जमिनीवर पडल्यानंतर तिच्या कंबरेवर, पाठीवर, तसेच पोटावर लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण केल्याप्रकरणी १) रामा केशव केदारी २) मन्या ऊर्फ अदित्य रामा केदारी ३) सोन्या बापु केदारी ४) सखाराम बापु केदारी या चार जणांवर शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास फिर्यादी महिला हौसाबाई कोळपे (वय ५०) या गावातील एका टपरीमध्ये माचीस आणण्यासाठी जात असताना कॅनॉलवरील पुलावर त्यांच्या गावातील १) रामा केशव केदारी २) मन्या उर्फ अदित्य रामा केदारी ३) सोन्या बापु केदारी ४) सखाराम बापु केदारी हे सर्वजन उभे होते. त्यावेळी फिर्यादी महिला या पुलावरुन जात असतांना त्यांना रामा केदारी यांनी ‘तुझा भाचा सागर गोरे हा कोठे आहे’ असे विचारले असता. त्या महिलेने त्याना सांगीतले की, मला सागर गोरे कोठे आहे मला माहीत नाही.
त्यानंतर त्या टपरीकडे जात असतांना १) रामा केशव केदारी याने त्यांच्या तोंडावर व गालावर हाताने मारहाण केली. त्यावेळी तेथे उभा असलेला २) मन्या उर्फ अदित्य रामा केदारी यांने त्यांना ढकलुन खाली पाडुले. त्यावेळी त्या जोरजोराने आरडा ओरडा करत असताना शेजारी उभे असलेले ३) सोन्या बापु केदारी आणि ४) सखाराम बापु केदारी यांनी त्यांच्या कंबरेवर, पाठीवर, पोटावर लाथा बुक्याने मारहाण केली आणि त्यानंतर ते निघुन गेले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गवळी हे करत आहेत.
