Pune Crime : सैतानच! पोटच्या मुलीवर वर्षभरापासून अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार, पुण्यात भयंकर प्रकार…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना पुणे शहरात घडली आहे. पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
तर या घटनेचा उलगडा शाळेतील गुड टच बॅट टच उपक्रमातून उघडकीस आला आला आहे. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नराधम बापाला पुणे पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

पंकज देवेंद्र ठाकूर (वय. ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मुळचा बिहारचा राहणारा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडित मुलगी वारजे माळवाडी परिसरात आपल्या आई-वडिलांसोबत राहते. ही मुलगी सहावीमध्ये शिकत असून ती ११ वर्षांची आहे. शाळेत गुड टच बॅड टच उपक्रम सुरू असताना मुलीने याबाबतची माहिती दिली. मुलीवर तिच्याच वडिलांनी घरी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. Pune Crime
मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवत बापाने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. उपक्रमादरम्यान पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार शिक्षिकेला सांगितला.
शिक्षिकेला देखील मोठा धक्का बसला. यानंतर शिक्षकांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी बापाविरोधात गुन्हा दाखल करत केला, काही तासांत नराधम बापाला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने आरोपी बापाला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.