महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल, आता 20 किलोमीटर मोफत प्रवास करता येणार, जाणून घ्या…


नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले असून नवीन नियम, राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम २०२४ या नावाने ओळखला जाईल. या नियमांतर्गत राष्ट्रीय महमार्गांवर सुरुवातीचे २० किलोमीटर शून्य शुल्क धोरण लागू करण्यात आलेले आहे.

यापूर्वी जुलै महिन्यात रस्ते मंत्रालयाने फास्टॅग सोबतच प्रायोगिक तत्त्वावर ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टम (जीएनएसएस) नुसार टोल संकलन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती. नवीन नियमांनुसार २० किलोमीटर पर्यंत मोफत प्रवास करायचा असल्यास जीएनएसएस चा अवलंब करावा लागणार आहे.

तसेच राष्ट्रीय महामार्ग, स्थायी पूल, बायपास रस्ता, बोगद्यातील रस्ता.. या मार्गावरील सुरुवातीचे २० किलोमीटर मोफत प्रवास करता येणार आहे. राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहनांना या नियमांनुसार लाभ घेता येणार नाही.

दरम्यान, वाहनाने २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला तर वाहनधारकांकडून पुढच्या २० किलोमीटरप्रमाणे फीस वसूल केली जाईल. या बदलांचा उद्देश हा जवळच्या प्रवासासाठी चालकांचा बोझा कमी करण्यासाठी आहे. लांबच्या प्रवासासाठी योग्य ते शुल्क आकारले जाणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!