Maharashtra Politics : ‘त्या’ उमेदवारांना विधानसभेची उमेदवार द्या!! मुंबई दौऱ्यात अमित शहा यांचे मोठं वक्तव्य

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री (ता.८) रविवारी मुंबईत दाखल झाले. यावेळी अमित शहा यांचा ताफा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाला. यावेळी शहा यांची महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाल्याची माहिती आहे. या बैठकीत राज्यातील निवडणुकींवर चर्चा झाली. यावेळी अमित शहा यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना मूलमंत्र दिला आहे.

अमित शहा म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फोकस करावं, स्थानिक विकास मुद्दे, राज्यातील शासनाच्या योजना यावर प्रचार प्रसार फोकस असावा, असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले. Maharashtra Politics

तसेच भाजप नेत्यांना सार्वजनिक वाद टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या. आपण महाआघाडीत आहे तर संयम बाळगून ऐक्याची प्रतिमा जनतेसमोर येईल याची काळजी घेतली पाहिजे, असे अमित शहा यांनी म्हंटले आहे.
जिंकण्याची क्षमता असलेल्या योग्य उमेदवारांची निवड करावी. विरोधकांच्या खोट्या वक्तव्यांना उत्तर देत रहा. भाजपच्या काही आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही, अशा स्थितीत जागांबाबत योग्य निर्णय घ्या, असे त्यांचे म्हणणे आहे.
भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीत अमित शहांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाकडेही लक्ष वेधले. यासोबतच अमित शहा यांनी भाजप नेत्यांना राज्य सरकारने घेतलेले निर्णय आणि योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना केल्या आहेत.