Pune : पुणे विमानतळाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पाठपुरावा..


Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी भूमिका पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे.

तसेच यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून नावासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, यासाठी मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

मोहोळ यांनी सांगितले की, विमानतळाचे नामकरण करतानाचा नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होते. म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. Pune

आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहोत, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की, पुण्याचे विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकाराम महाराजांचे नाते जिव्हाळ्याचे होते. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही माझ्याच भूमिकेप्रमाणे इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचे नाव देणे, हे अधिक समर्पक असणार आहे, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

समाजमाध्यमांमधून मोहोळ यांच्या भूमिकेचे स्वागत…

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी घेतलेल्या भूमिकेचे लोहगावातील ग्रामस्थांसह समाजमाध्यमातून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचे नावे देणे, अधिक समर्पक असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. या भूमिकेसंदर्भात मोहोळ यांनी समाज माध्यमांमध्ये केलेल्या पोस्टवर समर्थनार्थ भूमिकेचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!