अजब प्रेम की गजब कहानी! सासूच्या प्रेमात पडला जावई दोघांनी लग्नही केलं अन्….

बिहार : एका जावयाचा जीव चक्क त्याच्या सासुवर आला आहे. ही घटना बिहारमधील पूर्णियामध्ये घडली आहे. या घटनेची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. हा तरुण बिहारचा रहिवासी आहे. तर सासू पश्चिम बंगालची आहे.

तर सध्या तो तरूण पूर्णिया येथील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील आयना महल येथील रहिवासी आहे. तर त्याचं जिच्यावर प्रेम जडलं ती महिला कोलकाता येथील रहिवासी आहे.
सविस्तर माहिती अशी या प्रकरणातील युवक सोशल मीडियावरुन त्याच्या सासूबरोबर बोलत असायचा. पण बोलता- बोलता त्यांच्या दोघात प्रेम झालं. नंतर दोघांचं लग्नही झाले. मात्र त्या तरूणाचे या आधीच लग्न झाले होते, त्याचं ज्या महिलेवर प्रेम होतं तिच्या भाचीशीच त्याने लग्न केलं.

त्यामुळे नात्याने ती महिला त्याची सासू लागत होती. मात्र, नंतर तरुणाला कळले की, तो ज्या महिलेवर प्रेम करतो ती आधीच विवाहित होती आणि ती 3 मुलांची आई होती. हे कळताच तो संतापला आणि त्या महिलेला सोडून बंगालहून पूर्णियाला आला.
याप्रकरणी महिलेने सांगितले की, पूर्णिया येथेच त्यांची ओळख त्याच्या जावयाच्या छोट्या भावाशी, सोनू याच्याशी झाली. ती ओळख वाढली, तेव्हा सोनूने बहाण्याने त्यांचा मोबाईल नंबर मागून घेतला आणि त्या दोघांच्यात सोशल मीडियावर बोलणं सुरु झालं. बोलता बोलता एकमेकांच्या प्रेमाच पडले. त्यानंतर तो कोलकता येथे आला आणि त्याने त्या महिलेला एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला लावला.
त्याचदरम्यान दोघांची जवळीक वाढू लागली. मात्र एक दिवस त्या महिलेच्या पतीने त्या दोघांना रंगेहाथ पकडलं आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. यानंतर तिच्या पतीने तिला घरात ठेवून घेण्यास नकार दिला. मग तिचा प्रियकर सोनू याने सोबत राहण्याचे वचन दिले आणि बाँडही केला. पण त्यांच्या नात्यामुळे त्या महिलेच्या तीन मुलांनीही तिच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि ते त्यांच्या वडिलांसोबत राहू लागले.
पुढे महिलेने सांगितले की, नोकरी लागल्यानंतर पहिला पगार मिळताच तो व्यक्ती त्या महिलेला सोडून बिहारला पळून गेला. ती सोनूचा शोध घेत बिहारमध्ये आली. मात्र ती घरी परतताच तिचा प्रियकर सोनू पळून गेला.
नंतर ती पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचली आणि तिने घडलेली सगळी हकीकत सांगितली. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस कथित प्रियकराच्या घरी पोहोचले. सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरण मिटवण्यासाठी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर त्या तरूणाच्या आईने, त्या महिलेचा सून म्हणून स्वीकार केला आहे. यावेळी तरुणाच्या आईने सांगितले की, त्यांच्याकडे कोणतीही जमीन नाही. ती तिच्या मोठ्या मुलासोबत घरात राहते.